एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकअभिनेत्रीचा पहिला पती 18 वर्षांनी मोठा तर दुसरा पती 7 वर्षांनी लहान; तीन मुलांना दिला जन्म; ऋतिक रोशनबरोबर केलंय काम
Actress Tannaz Iran : अभिनेत्रीचा पहिला पती 18 वर्षांनी मोठा तर दुसरा पती 7 वर्षांनी लहान; तीन मुलांना दिला जन्म; ऋतिक रोशनबरोबर केलंय काम
By : जयदीप मेढे|Updated at : 03 Jun 2025 12:19 PM (IST)
Actress Tannaz Iran
Source :
ABPLIVE AIActress Tannaz Iran : सध्याच्या घडीला बॉलिवूड इंडस्ट्री अतिशय मॉडर्न झाली आहे. आता अनेक अभिनेत्रींची लग्न वयाच्या 40 किंवा 45 व्या वर्षी होता. शिवाय, काही अभिनेत्रींनी त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्यांशी देखील लग्न केलेले आहे. मात्र, बॉलिवूडमध्ये पूर्वीच्या काळात अभिनेत्रींची फार कमी वयात लग्न व्हायची. मात्र, एक अशी अभिनेत्री आहे जिचा पहिला विवाह हा वयाने 18 वर्षांनी मोठा असलेल्या व्यक्तीसोबत झाला तर दुसरा विवाह वयाने 7 वर्षांनी लहान असलेल्या व्यक्तीसोबत झाला. पहिलं लग्न करताना तिचं वय अवघं 20 वर्ष होतं आणि पहिला पती जवळपास दुप्पट वयाचा होता. शिवाय तिने 3 मुलांना जन्म देखील दिला.
वयाच्या 20 व्या वर्षी पहिलं लग्न
खरंतर आपण बोलत आहोत अभिनेत्री तनाज इरानी हिच्याबद्दल... तिचा पहिला विवाह झाला तेव्हा तिचं वय केवळ 20 होतं. तिचे पती फरीद कुर्रिम हे एक थिअटर आर्टिस्ट, गायक आणि कलाकार देखील होते. ते तनाज पेक्षा 18 वर्षांनी मोठे होते म्हणजे त्यांचं वय तनाजच्या वयापेक्षा दुप्पट होतं. मात्र, त्या काळी फरीद यांनी सर्वांना हैराण करुन सोडलं होतं. पण तनाज फरीदची कला आणि प्रतिभा पाहून मोहित झाली होती. त्यांचं वैवाहिक आयुष्य 8 वर्ष सुरु राहिलं. दरम्यानच्या काळात त्यांनी जियान या मुलीला जन्म दिला. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्या नात्यात दुरावा आला. तनाजने एका मुलाखतीत सांगितलं की, मला पार्टी करायची होती, कामात व्यस्त राहायचं होतं. मात्र, त्याने सर्व काही यापूर्वीच पाहिलं होतं. आम्ही दोघं आयुष्याच्या वेगवेगळ्या फेजमध्ये होतो. मात्र, नंतरच्या काळात त्यांचा घटस्फोट झाला. मुलगी जियान हिने वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
A post shared by Bakhtyar m irani (@bhakhtyar)
See AlsoTwenty One Pilots’ New Song “The Contract” Is, Frankly, Atrocious‘S.W.A.T.’ Actor David Lim Says Shemar Moore Doing a Spinoff Without Full Cast Does ‘Sting’: ‘Felt Like We Were Brushed Aside’5 Actors Who Almost Played The Walking Dead's Negan Before Jeffrey Dean Morgan - SlashFilmBen Stiller Has The Perfect Response To Reports About Severance's Troubled Production - SlashFilm
जेव्हा तनाज दुसऱ्यांना प्रेमात पडली
2006 मध्ये ‘गुरुकुल’ या रिअॅलिटी शोच्या सेटवर तनाज पुन्हा एकदा प्रेमात पडली. या वेळेस तिने अभिनेता बख्तियार ईरानीला डेट करायला सुरुवात केली. बख्तियार तनाजपेक्षा सात वर्षांनी लहान होता. वयातील फरक आणि धार्मिक मतभेदांमुळे बख्तियारच्या कुटुंबीयांनी या नात्याला तीव्र विरोध केला. मात्र, बख्तियारची बहीण – अभिनेत्री डेलनाज ईरानी आणि त्याच्या मोठ्या भावाच्या सहकार्यामुळे, 2007 मध्ये तनाज आणि बख्तियारने लग्न केले. तनाज जन्माने पारसी आहे, आणि दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे त्यांच्या समाजातील काही लोकांनी या नात्याला विरोध दर्शवला. पण तनाज मागे हटली नाही आणि ती आजही बख्तियारसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.
तीन मुलांची आई बनलेली आहे तनाज
तनाज आणि बख्तियार यांना दोन मुले आहेत. त्यांचा मुलगा जिउसचा जन्म 2008 मध्ये झाला आणि मुलगी जाराचा जन्म 2011 मध्ये झाला. दुसरीकडे, तनाजला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेली मुलगी जियान सध्या तिच्या वडिलांसोबत वाढत आहे, आणि तनाजसोबत तिचे चांगले को-पेरेंटिंग नाते आहे.
सिल्व्हर स्क्रीनपासून छोट्या पडद्यापर्यंतचा प्रवास
करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर, तनाजने चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. तिने ऋतिक रोशन आणि अमीषा पटेलच्या ‘कहो ना… प्यार है’ या चित्रपटात सहायक भूमिका साकारली होती. याशिवाय, तिने करीना कपूरसोबत ‘36 चायना टाउन’ आणि ‘रहना है तेरे दिल में’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले.
टेलिव्हिजनवर मात्र ती अधिक प्रसिद्ध झाली – ‘कुसुम’, ‘ये मेरी लाइफ है’, ‘बड़ी दूर से आए हैं’, ‘कहां हम कहां तुम’ यांसारख्या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. याशिवाय, तिने तिच्या नवऱ्याबरोबर ‘बिग बॉस 3’ आणि ‘नच बलिए’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आणि टॉप 3 फायनलिस्टपैकी एक बनली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Pune Yashwantrao Chavan Natyagruha: पुण्यात नाटकाच्या प्रयोगावेळी महिलेल्या साडीत शिरला उंदीर, प्रेक्षकांची पळापळ, इंजेक्शन घेण्याची वेळ
Nisha Aur Uske Cousins Fame Actor Death: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याचं निधन, स्टेज 4 कॅन्सरशी झुंज अपयशी; इंडस्ट्रीवर शोककळा
Published at : 03 Jun 2025 12:17 PM (IST)
Tags :
Bollywood News ENTERTAINMENT #Marathi News HRITHIK ROSHAN Actress Tannaz Iran
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
Advertisement
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अभय पाटील
MI vs PBKS IPL 2025: श्रेयसचा आत्मविश्वास, मुंबई खल्लास
Opinion